कोपरगाव महाराष्ट्र

कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन 

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिराती संपर्क 9823752964

कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

कोपरगाव समाधान भुजाडेकोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथे येथील युवा परिवर्तन फाउंडेशन च्या वतीने व समस्त ग्रामस्थ यांच्या विशेष सहकाऱ्यांने  छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव निमित्त दिनांक 19 फेब्रुवारी 2021 रोजी आपेगाव येथे कबड्डी, चित्रकला, निबंध स्पर्धा यासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवा परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी दिली.

या विशेष दिनानिमित्त होणारे विविध कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे (चित्रकला स्पर्धा वय ०६ ते ०९ वर्ष वेळ दुपारी ०२ ते ०३ स्पर्धेची वेळ ०१ तास), (निबंधस्पर्धा वय १० ते १४ वर्ष वेळ दुपारी ०४ ते ०५ वेळ ०१ तास ), कबड्डी स्पर्धा वय १६ ते ३० वर्ष वेळ सकाळी ०९ ते ०१ वाजेपर्यंत या कबड्डी स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक ०३ हजार १०० तर  व्दितीय पारितोषिक ०२ हजार १००, तृतीय पारितोषिक ०१ हजार १०० सदर कबड्डी स्पर्धा करिता २०० रुपये फी घेण्यात आली आहे. सदर नाव नोंदणी करिता १८ फेब्रुवारी सायंकाळी ०५ पर्यंत नाव नोंदणी स्वीकारली जाणार आहे. सदर नाव नोंदणी 72 63 89 82 99 या नंबरवर नोंदविण्यात यावी.   

याच विशेष दिनानिमित्ताने ह.भ.प. अर्जुन महाराज साळुंखे यांचे कीर्तनाचा कार्यक्रम संध्याकाळी ०८ वा. होणार असुन समस्त ग्रामस्थांनी व शिवभक्तांनी आपेगाव येथील हनुमान मंदिर जवळ उपस्थित राहावे तसेच राज्यात पुन्हा कोरोना संक्रमीत रुग्णांची वाढ होत आहे. तरी, आपण सर्वांनी आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने घालुन दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

आपल्या अवतीभवती असलेल्या कित्येक चांगल्या व जीवास जीव देणा-या व्यक्तींना ह्या दुष्ट कोरोनाने क्षणाचाही विलंब न लावता आपल्यातुन हिरावुन नेले आहे.‌ त्यामुळे आपण सर्वांनीच पुर्वी पेक्षा अधिक काळजी घेऊनच सार्वजनिक जीवनात वागले पाहिजे. त्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ह्या शासनाच्या निर्देशाचे पालन करणे आवश्यक असल्याचे  आवाहन युवा परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्यासह फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी सभासद यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker