कोपरगाव महाराष्ट्र
आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये मोफत सर्व रोगनिदान शिबीराचे आयोजन – अमित फरताळे
संपादक मनिष जाधव 9823752964
Follow
X
Follow
शिवजयंतीनिमित्त आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये मोफत सर्व रोगनिदान शिबीराचे आयोजन
कोपरगाव मनिष जाधव – कोपरगाव तालुक्यातील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मालिक हॉस्पिटल संचालित द्वारा एव्हरहेल्दी हॉस्पिटल प्रा.लि. यांच्या वतीने शिवजयंती निमित्ताने आत्मा मालिक हॉस्पिटल येथे मोफत सर्वरोग निदान शिबिर दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित केले असल्याची माहिती आत्मा मालिक हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित फरताळे यांनी दिली.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत येणारे सर्व उपचार मोफत खालील दिलेल्या आजारांविषयी तज्ञ डॉक्टरांचे खात्रीशीर वैद्यकीय सल्ला मार्गदर्शन व मोफत तपासणी देखील केली जाणार आहेत. शिबीरात सविस्तर माहितीपुढील प्रमाणे
दंतरोग विभाग – ओपीडी तपासणी व मार्गदर्शन मोफत कुत्रिम दातांवर 20 टक्के सवलत, तोंडाचे (मुख) कर्करोग , जबड्याचे फॅक्चर, दातामध्ये सिमेंट भरणे, एक्सरे सवलत दर (१००), दात साफ करणे सवलत दर (२००), दात बसविणे सवलत दर (१०००), रुट कॕनल उपचार (१५००), नेत्ररोग विभाग – मोतीबिंदू सवलत दर (४५००), लासुर सवलत दर (३५००), बुबळावरील पडद्याची शस्त्रक्रिया सवलत दर (३०००)

महात्मा फुले जन आरोग्य अंतर्गत मोफत सेवा उपलब्ध खालील प्रमाणे
हृदयरोग विभाग– अॕन्जिओप्लास्टी, बायपास वाॕल्व्ह रिप्लसमेंट (झडपांचे आजार), थोम्बोलाईज ( रक्ताच्यागाठी पातळ करणे), जनरल सर्जरी विभाग – फाटलेले आतडी व चिकटलेली आतडी, आतड्यांचे सर्व प्रकारचे आजार, प्लास्टिक सर्जरी, छातीचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, जठर व अन्ननलिकेची कॅन्सर, मूत्रपिंड व मूत्राशयाचा कॅन्सर, रक्त व हाडांचा कॅन्सर थायरॉइडचा कॅन्सर,
युरो सर्जरी विभाग – सर्व प्रकारचे मुतखडा यांचे आजार, प्रोस्टेटचे आजार, लघवी थेंब थेंब होणे व थांबणे अस्थिरोग विभाग – विविध प्रकारचे मोडलेली हाडे, मणक्यांचे आजार, शिबिरातील विशेष सवलत केसपेपर ई.सी.जी साखर तपासणी पूर्णपणे मोफत, एक्स-रे २डी.ईको इतर तपासण्या 25 टक्के सवलत वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड व आधार कार्ड सोबत आणावे अधिक माहितीसाठी 730 47 55 655 70 30 940 954 70 30940 957 70 30 940 953 सदर शिबीराचे जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावे असे आवाहन देखील फडताळे यांनी केले आहे.

