अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवुन पळवुन नेणारे आरोपीस 24 तासात अटक ; पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी उत्कृष्ट कामगीरी
संपादक मनिष जाधव 9823752964
Follow
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवुन पळवुन नेणारे आरोपीस अल्पवयीन मुलीसह 24 तासात अटकपोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी उत्कृष्ट कामगीरी
कोपरगाव मनिष जाधव – दिनांक १५ फेब्रुवारी रोजी राञी अण्णाभाऊ साठे पुतळयाजवळ कोपरगांव येथे राहणारे गरीब मजुर कुटुंबातील अल्पवयीन १२ वर्षे वय असणारी मुलगी राहते घरातुन बाथरुम करता जावुन येत असे सांगुन गेली ती परत आली नाही म्हणुन तीचे आई वडीलांनी व नातेवाईकांनी तीचा आसपास परिसरात तपास करुन पो.स्टे.ला आलेने पो.नि.हर्षवर्धन गवळी यांनी लागलीच त्यांचेकडे आस्थेने व बारकाईने चौकशी करुन अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवुन नेले आहे अशी फिर्याद नोंदवुन घेवुन सदर बाबत तातडीने कोपरगांव शहर पो.स्टे. गुरनं 53/2021भादविक. 363 प्रमाणे दाखल केला.

गुन्हा दाखल होताच तातडीने अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे व उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे पो.नि.हर्षवर्धन गवळी यांनी पोसई नागरे, स.फौ.ससाणे, पोहेकॉ.तिकोणे, पोहेकॉ.पुंड, पोकॉ.अग्रवाल,पोकॉ.शिंदे, पोकॉ.खारतोडे, पोकॉ.कुळधर,पोकॉ.कुंढार, मपोकॉ.त्रिभुवन अशाचे दोन वेगवेगळे पथक तयार करुन घटनास्थळावर जावुन बारकाईने तसेच अल्पवयीन मुलीचे आई वडीलांकडे व त्यांचेकडे असलेल्या मोबाईलचे आधारे चौकशी करुन राजु पोपट पगारे रा.तळवाडे ता.येवला जि.नासिक यास ता.16/2/2021 रोजी ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे चौकशी करता त्याने अल्पवयीन मुलगी त्याच्याच शेतातील घरात असल्याचे सांगीतलेने सदर मुलीस ताब्यात घेवुन कोपरगांव येथे आणले सदर अपहरीत अल्पवयीन मुलीस तिचे आई वडीलांसमक्ष विचारपुस करता संबंधीत आरोपीताने तिस लग्नाचे आमीष दाखवुन फुस लावुन पळवुन नेले होते व तो तिचे सोबत लग्न करणार होता असे सांगीतलेने राजु पोपट पगारे रा.तळवाडे ता.येवला जि.नासिक यास सदर गुन्हयाचे कामी ता.16/2/2021 रोजी 19.32 वा.अटक करण्यात आलेली असुन गुन्हयास भादविक.366 हे वाढीव कलम लावुन अटक आरोपीताची ता.20/2/2021 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. अल्पवयीन १२ वर्षाचे अपहरित मुलीचा २४ तासाचे आत तपास करुन अल्पवयीन मुलीसह आरोपीस कोपरगांव शहर पो.स्टे.चे पो.नि.हर्षवर्धन गवळी व ईतर स्टाफने उल्लेखनिय कामगीरी केली आहे.