कोपरगाव महाराष्ट्र

समृध्दी महामार्गाचे चालु असलेल्या कामा वरील वाहनाचे डिझेल चोरणारी टोळी अटकेत

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 1 Followers )
X

Follow

E-mail : *

 

समृध्दी महामार्गाचे चालु असलेल्या कामा वरील वाहनाचे डिझेल चोरणारी टोळी अटकेत

कोपरगाव मनिष जाधव – रक्ताटे वस्ती येथील समृध्दी महामार्गाचे कॅम्पवर कोकमठाण शिवार ता.कोपरगांव या ठिकाणाहुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने ०१ लाख १३ हजार २०० रुपये किंमतीचे ११४० लि. डिझेल, लुकस कंपनीचे सेल्फ स्टार्टर, ॲमेरॉन कंपनीचे काळे रंगाची बॅटरी व लुमीनस कंपनीचे लाल रंगाची बॅटरी तसेच चार बॅटऱ्याचे केबल असा माल चोरुन नेलेने विक्रांत राजेंद्र सोनवणे रा.गजानननगर कोपरगांव यांनी फिर्याद दिलेने सदर बाबत कोपरगांव शहर पो.स्टे. गुरनं 55/2021 भादविक.379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गुन्हा दाखल होताच तातडीने मा.अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे मॅडम व उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे पो.नि.हर्षवर्धन गवळी यांनी पोसई.नागरे, स.फौ.ससाणे, पोना.दारकुंडे, पोकॉ. गणेश मैड, पोकॉ. शिंदे, पोकॉ. खारतोडे, पोकॉ.कुळधर, पोकॉ.कुंढारे अशाचे दोन वेगवेगळे पथक तयार करुन घटनास्थळावर जावुन बारकाईने चौकशी करुन गुप्त बातमीदारामार्फत माहीती काढुन आरोपी 1) अमोल मच्छिंद्र आहेर रा.वाकडी ता.राहता  2) चेतन अरविंद गिरमे रा.धारणगांव ता.कोपरगांव 3) राजीवसिंह राम आसरेसिंह रा.मर्गुपुर पोस्ट तेजीबझार जि.जौनपुर राज्य उत्तप्रदेश 4) अंगदकुमार रामपाल बिंद रा.रामनगर ता.सहागंज जि.जौनपुर राज्य उत्तरप्रदेश अशांना अटक करुन त्यांचेकडुन २ लाख ३६ हजार १५०रुपये  किंमतीचा माल त्यात एक टाटा कंपनीचा पिकअप टेम्पो एमएच-17-अेजी-7601,4 प्लॅस्टीकचे 4 मोठे बॅरेल प्रत्येकी 250 लिटर क्षमतेचे त्यात 1000 लिटर डिझेल भरलेले,एक काळे रंगाचा ड्रम त्याचे बुडाला छिद्र पडलेले ,30 लिटर डिझेल ,एक 6 फुट लांबीची अर्धा इंच व्यासाची प्लॅस्टीकची नळी जुनी वापरती असा माल जप्त करण्यात आलेला असुन आरोपीताची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. अशा प्रकारे डिझेल चोरी करणारे टोळीचा 24 तासाचे आत तपास करुन चोरीस गेला माल व चोरी करण्याकरीता वापलेले वाहन,साहीत्यासह 4 आरोपीतांना कोपरगांव शहर पो.स्टे.चे पो.नि.हर्षवर्धन गवळी व ईतर स्टाफने उल्लेखनिय कामगीरी केली आहे.

जाहिराती संपर्क 9823752964

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker