कोपरगाव महाराष्ट्र

कोपरगाव तालुक्यात प्रशासनाकडून कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू- योगेश चंद्रे

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिराती संपर्क 9823752964

कोपरगाव तालुक्यात प्रशासनाकडून कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे

कोपरगाव मनिष जाधव – कोपरगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करिता प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी सुरु झाली असल्याची माहिती तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे यांनी दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांचे अध्यक्षतेखाली जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संदिप पोखर्णा,जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय विविध खात्यांचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांचेशी कोरोना नियंत्रणासाठी प्रभावीपणे पाऊले उचलण्याचे आदेश दिले आहे.

कोपरगाव तहसिल कार्यालय येथे तहसिलदार योगेश चंद्रे यांचे दालनात व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे जिल्हा प्रशासनाकडून संवाद साधण्यात आला आहे.या बैठकाला गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव,शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे(आव्हाड), ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक सरकारी व निमसरकारी कार्यालयात “नो मास्क-नो एन्ट्री” सक्तीने करण्यात येणार असून ज्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक लस घेतली नसेल त्यांनी तातडीने लस घेण्याची सुचना केली आहे.

तसेच कोविड केअर सेंटर,कोविड हेल्थकेअर सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्याची तयारी करण्यात यावी.कोविड बाधित रुग्णांचे विलिनीकरण तसेच त्यांचे संपर्कातील व्यक्तींची चाचणी करणे.दुधविक्रेते, फेरीवाले, दुकानदार अशा गतीने फैलाव करणारी केंद्रावर मास्क, सॅनेटायझर व्यवस्था तसेच सुरक्षित अंतर ठेवणे बाबत आवश्यक ती काळजी संदर्भात दुर्लक्ष करणार्यांवर कारवाईचे संकेत दिले आहे.आवश्यक तेथे घशातील श्राव चाचणी करुन घेणे.कोविड-१९ बाधीत व्यक्तींना इतरांना बाधा होवू नये करीता त्यांचे हालचालीवर निर्बंध आणणे.सहकार्य नकरणार्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करणे.लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर मोठ्या प्रमाणात होणारे गर्दीचे कार्यक्रमावर ५० पेक्षा जास्त व्यक्ती तसेच तेथे मास्क, सॅनेटायझर न वापरणारे आढळून आले वर जबाबदारी निश्चित करुन नियमानुसार कारवाई करणे.शाळा, महाविद्यालय येथे मास्क, सॅनेटायझर वापर बंधनकारक असून तेथे पथकाद्वारे तपासणी करण्यात यावी.विनामास्क फिरणारे यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.या संदर्भात अधिकार पोलीस व नगरपालिका यांना देण्यात आले आहे.तसेच एस.टी.,बसेस,ट्रॅव्हल्स,रिक्षा कॅब यांना अनुज्ञेय क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. हाॅटेल,फुड कोर्टस् , रेस्टॉरंट ,बार व तस्तम ठिकाणी ५० टक्के क्षमतेने शारिरीक अंतराने व स्वच्छतेच्या उपाययोजना सह ( पर्यटन विभागाचे Sop नुसार) निर्देशांचे पालन करावे.

कोपरगाव तालुक्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशाचे पालन प्रशासनाकडून करण्यास सुरुवात झाली असून या आदेशाचे उल्लंघन केल्यास साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.तरी कोपरगांव तालुक्यातील नागरिकांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वरील आदेश व नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker