Follow
X
Follow
जुन्या उधारीच्या वादातून झालेल्या हाणामारीत खुन
येवला (कौसर सय्यद) – तालुक्यातील पाटोदा येथे जून्या उधारीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असून येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असल्याची माहिती येवला तालुका पोलिसांनी दूरध्वनीवरून दिली आहे या मृत्यप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून खुनाच्या या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे दारूच्या नशेत झालेल्या या घटनेत ठाणगाव (ता येवला) येथील एकाचा बळी गेला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की ठाणगाव येथील संजय रामचंद्र शिंदे (४०) यांचेकडे पाटोदा येथील अरुण वाळूबा कुऱ्हाडे यांची सुमारे दिड वर्षांपासून एक हजार रुपयांची उधारी होती. वेळोवेळी मागणी करूनही शिंदे यांनी कुऱ्हाडे यांची उधारी देण्यास टाळाटाळ चालवली होती उधारीच्या पैशावरून आज सकाळी दोघांमध्ये दारू पिऊन वादावादी होऊन प्रकरण हाणामारी पर्यत पोहचले या हाणामारीत शिंदे यांना जास्त मार लागल्याने ते तसेच जखमी अवस्थेत घटनास्थळी पडून होते घटनेची माहिती पोलीस पाटील मुजमील चौधरी यांनी येवला तालुका पोलिसांना देऊन जखमीला रुग्णवाहिकेतून प्राथमिक आरोग्य केंद्र पाटोदा येथे तपासणीसाठी पाठवले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय येवला येथे पाठवले असता येवला ग्रामीण रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.

येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित अरुण वाळुबा कुऱ्हाडे याला तपासासाठी ताब्यात घेतले आहे.खुनाचा हा प्रकार जुगार व दारुसाठी झालेल्या पैशांमधून झाला असल्याची चर्चा होत आहे पाटोदा येथे काही वर्षांपूर्वी दारूच्या नशेत खूनासारखा गंभीर गुन्हा घडलेला आहे आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाली असून या प्रकाराने खळबळ उडाली आहे पाटोदा येथील दारूचा प्रश्न पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे घेऊन जाणारा ठरला आहे. शहर व तालुका परिसरात अवैध धंद्या वर पोलिस प्रशासनाच्या अंकुश नसल्याने सदर प्रकार घडला असल्याची चर्चा जनतेत आहे.
