कोपरगाव महाराष्ट्र

अरे देवा…कोपरगांवमध्ये मयतालाही कपडा मिळेना

कोपरगांव परिसर 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

अरे देवा…कोपरगांवमध्ये तालाही कपडा मिळेना, अडचणी वाढल्या त्यात चोरीचे प्रमाण वाढले

” वेळ नाजुक आहे जरा सांभाळून रहा, हे युध्द थोड वेगळं आहे दूर राहून लढा,
खरं पाहील तर जीवनावश्यक काहीच नाही, जीवनच आवश्यक आहे.”
कोपरगाव येथील प्रसिध्द उद्योजक श्री. अजितशेठ शिंगी यांनी देखील त्यांच्या माध्यमातून वस्तुस्थिती व परिस्थिती या संदेशाच्या माध्यमातुन नागरिकांना आवाहन करण्याचा छोटासा एक प्रयत्न केला.
 
कोपरगांव परिसर – कोपरगांव शहरासह ग्रामीण भागात कोरोनाची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. शासनाने घालुन दिलेले नियमाचे पालन नागरीकांनी न केल्याने परिस्थिती हाता बाहेर गेली असे चिञ प्रशासनाच्या डोळ्यासमोर उभे राहिल्याने शासनाने व अधिका-यांना कठोर पाऊले उचल्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नव्हता. कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यूची आकडेवारी देखील शतकाच्या दिशेने निघालेली आहे. सध्या जाहिर केलेले ब्रेक द चेन मुळे जवळजवळ सर्वांचे नियोजन विस्कळीत झाले परंतु ज्यांचे विविध कारणांनी, आजाराने निधन झाले त्यांना आत्ताच्या परिस्थितीत विधी प्रसंगी मयतालाही कपडा मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्य सरकार लाॅकडाऊन करणार नाही, मला कोरोना होणार नाही, मी आता लस घेतली आहे, मला एकदा कोरोना होवुन गेला आता होणार नाही असा आत्मविश्वास मनात निश्चित करुन ठराविक नागरिकांनी गेल्या एक वर्षापासुन विस्कळीत झालेले सर्व जनजीवन सुरळीत करण्यासाठी मागचे सर्व विसरुन एकप्रकारे नवीन आयुष्य सुरु केलेले असले तरीही आपले व कुटुंबियांचे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असतांना देखील नागरिक कोणतेही काळजी न घेता, कोणाचा विचार न करता कोपरगांवकरांनी एकाएकी धावपळ सुरु केल्याची परिस्थिती सर्वच डोळ्यांने फक्त बघत आहे परंतु कृती माञ शुन्य आहे. कोपरगाव मध्ये जी परिस्थिती आहे तशी परिस्थिती इतर ठिकाणी अशा पध्दतीने आहेत.
शांततेसाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अहमदनगर जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार कोपरगांवचे नगरपरिषदेचे मुख्यधिकारी यांनी अत्यावश्यक सेवा सोडुन ब्रेक द चेन मिशन जाहीर केल्यानंतरही नागरिकांमध्ये कोणताही बदल होतांना दिसला नाही उलट नागरिकांची कोणकोणत्या कारणाने बाजारपेठेत  धावपळ कमी होण्यापेक्षा वाढलेली दिसत असल्याने जनतेने काळजी घेण्यासाठी प्रशासनाने सोशल मिडीया,  दंडात्मक कारवाई, पोलीस खाकीचा दंडुक्याचा प्रसाद, वेळोवळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी देखील त्यांच्या चारोळयाच्या माध्यमातुन देखील जनतेला आरोग्य, नियमाबाबत आवाहन करुन देखील कुठलाही बदल झालेला नाही, कारण वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन व जवाबदारीने काळजी घेतली गेली असती तर कोपरगांवमध्ये कोरोना बाधितांची आकडेवाडी मध्ये वाढ झाली नसती. पण नागरिकांना हे पण लक्षात येईना की, शासनाने ब्रेक द चेन सारखा निर्णय घेतला यात सर्वात प्रथम आपलाच व्यवसाय, दुकान बंद होणार त्याचबरोबर आपल्यासह आपले कुटुंबातील नागरिकांची गैरसोय होणार असे म्हण्यापेक्षा नागरिकांची गैरसोय झाली इतकी गैरसोय झाली की, मयताला कपडा देखील मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आत्ता पर्यंत जे काही मोठे आजार आले ते आजही आहे त्याचबरोबर कोरोना देखील आता आपल्या सोबत कायमस्वरुपीच राहणार अशी स्वतःची मानस्किता व आपल्या मनात एकप्रकारे गाठ बांधुन घेतली. नागरिकांना कोरोना पासुन संरक्षण व उपाय योजना करता करता पोलीस , नगरपरिषदेतील कर्मचारी , अधिकारी देखील कोरोना बाधित झाले. आता तरी नागरिकांनी डोळे उघडले पाहिजे. आत्ता कुठतरी स्वतः मध्ये बदल झाला पाहिजे. नागरिक स्वतः आपल्यात बदल करुन घेणार किंवा प्रशासन कठोर पाऊले उचलुन बदल घडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker