कोपरगाव महाराष्ट्र

शासकिय यंत्रणेला थकवून टाकू नका – विजय वहाडणे 

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

शासकिय यंत्रणेला थकवून टाकू नका – विजय वहाडणे 

कोपरगाव परिसर – सोमवारी कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोड, गोदावरी पेट्रोल पंप ते वीर सावरकर चौक या मुख्य रस्त्यांवर भाजीपाला व इतर खरेदीसाठी प्रचंड गर्दि झाली होती. रस्त्याने चालणेही अवघड झाले होते. भाजीपाला व फळे यांची दुकाने मांडायची परवानगी नसूनही असे घडले. नगरपरिषदेचे कर्मचारी-अधिकारी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये  रात्रंदिवस कामात आहेत. अमरधाममध्ये अंत्यसंस्कारही हेच कर्मचारी करतात. रस्त्यावर दुकाने थाटून बसलेले काहीजण याच कर्मचाऱ्यांना दमबाजी करतात, जुमानत नाहीत.

गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला, मृत्यूचेही प्रमाण वाढले तरीही काहीजण निर्लज्जपणे गर्दि करताहेत. याच गर्दीचे फोटो, बातम्या झळकल्याने प्रशासन नाहक बदनाम होत आहे. खरे तर नगरपरिषद, पोलीस-महसूल विभाग, वैद्यकीय सेवा करणारे सर्वजण अतिशय परिश्रम घेत असतांनाही दोषारोप सहन करावे लागतात. नागरिकांचे जिवित रक्षणासाठी प्रयत्न करणारी यंत्रणा थकली तर काय? याचा विचार होणार आहे कि नाही? आपण आपल्याच कोरोना रुग्णाजवळही जाऊ शकत नाही, याची जाणीव ठेवून जनतेने सहकार्य करावे, भाजी व फळे विक्रेत्यांनी दुकाने मांडून बसू नये, तसा शासकिय आदेशही आहे. नागरिकांनी संचारबंदीत विनाकारण घराबाहेर पडून गर्दि करू नये.

विक्रेत्यांनी घरपोच सेवाच द्यावी. आज नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकारी-सर्व पोलीस यांच्यासह आम्ही शहरात अनेक ठिकाणी फिरून गर्दी होऊ नये यासाठी नागरिकांना आवाहनही केले. यानंतर प्रतिसाद द्यायचा कि नाही हे नागरिकांनीच ठरवायचे आहे. वारंवार सांगून, अनेक कारवाया करूनही नागरिक अशाच पद्धतीने वागणार असतील तर प्रशासन तरी काय करणार? पत्रकार बंधूही अनेकवेळा याविषयी वस्तुस्थिती मांडतात, दाखवतात तरीही लोक गांभीर्याने घेत नाही हे दुर्दैव आहे. जनतेला विनंती आहे कि, शासकिय यंत्रणेला थकवून टाकू नका, सहकार्य करा. तरच तुमचा आमचा सगळ्यांचा बचाव होणार आहे हे लक्षात असू द्या अशा सुचना नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker