कोपरगाव महाराष्ट्र

राज्य कोरोना मुक्तसाठी २० दिवसच महत्वाचे – सौ. स्नेहलता कोल्हे

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

कोपरगांव मतदारसंघ बरोबर राज्य कोरोना मुक्तसाठी २० दिवसच महत्वाचे – सौ. स्नेहलता कोल्हे

येत्या १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी घेतला आहे.यासाठी सर्वांनी जबाबदारीने लसीकरण करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल – सौ. स्नेहलता कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी:- दिवसेंदिवस विषाणू संसर्गाची साखळी वाढत आहे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी तसेच कोपरगांव मतदारसंघात कडक निर्बंध तसेच उपाय योजना, जनजागृती, असे विविध माध्यम फक्त प्रत्यकाने 20 डेज मिषन माध्यमातुन प्रयत्न केले तर निष्चितच मतदारसंघा बरोबर राज्य देखील कोरोना मुक्त होण्यास वेळ लागणार नाही यासाठी असा एक प्रभावी कृती कार्यक्रम राबवावा असे मत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशसचिव सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील संजीवनी कोविड केअर सेंटरच्या पाहणी नंतर उपस्थित प्रशासकीय अधिकारी यांची बैठक संपन्न झाली या प्रसंगी सौ. कोल्हे बोलत होते.

कोरोनामुक्ती होण्यासाठी प्रथमतः कोरोना बाधित शोधणे गरजेचे असून त्यासाठी कोरोना संसर्ग जलद चाचण्या अधीक होणे आवश्यक आहे. रुग्ण आढळल्या नंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींना सामाजिक सभागृहे,शाळा यासह उपलब्धे नुसार गावपातळीवर विलगिकरण करण्यात यावे. त्यामुळे इतरांमध्ये संसर्गाचा होणारा फैलाव कमी होऊ शकतो. यासाठी माझा गाव कोरोनामुक्त गाव संकल्पना आणि शहरी भागात माझा वार्ड कोरोनामुक्त वार्ड असा उपक्रम राबविला जाणे गरजचे आहे.

तसेच शासनाने आरोग्य यंत्रणेला गतिमान करण्यासाठी सर्व आमदार निधी हा कोरोना उपाययोजना करण्यासाठी शंभर टक्के वापरला जावा. सर्वांनी एकोप्याने लढा देऊन 20 दिवसांचा अजेंडा घेऊन काम सुरू केले तर आपण कोपरगाव बरोबर राज्य देखील  कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. कोरोना रुग्णांच्या मनातील भीतीचे वातावरण काढून टाकून हा संसर्गामुळे होणारा आजार असून आपण सकारात्मक विचार करून योग्य उपचार घेतले तर आपण सहज कोरोनाला हद्दपार करु शकतो यातुन  रुग्णांनाही मानसिक आधार देऊन भीतीचे वातावरण न ठेवता नागरिक स्वतःहून प्राथमिक आरोग्य केंद्रावर जावुन तपासणी व उपचार घेण्यासाठी प्रयत्नशील राहतील असे मिशन राबविणे आवश्यक असल्याचे मत सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी या बैठकीत व्यक्त केले.

या बैठकीस तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, स्वच्छतादुत सुशांत घोडके आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker