आरोग्य व शिक्षणकोपरगाव महाराष्ट्र

महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे एक वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार

मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे एक वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार

अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या पाच हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस

संगमनेर ( कोपरगाव परिसर ) कोरोनाच्या संकटात सातत्याने जनमाणसांना मदत करून दिलासा देणारे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते व राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी स्वतःच चे एक वर्षाचे मानधन मोफत लसीकरणाकरीता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले असून नामदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर मधील अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांच्या सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा निधीही मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिला जाणार आहे.


सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी  नामदार बाळासाहेब थोरात हे सातत्याने अविश्रांतपणे काम करत आहेत. याचबरोबर कोणत्याही संकटात ते नेहमी जनतेच्या मदतीला उभे असून कोरोना संकटात राज्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून या विभागाला अत्यंत कार्यक्षम करताना त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, तालुके व विभागांचा दररोज आढावा घेऊन कोरोना वाढ थांबवण्यासाठी सूचना देत आहेत. याचबरोबर सध्या सर्वत्र ऑक्‍सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून यावर मार्ग काढण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असून स्वतंत्र कक्ष बनवून त्यामार्फत पाठपुरावा केला जात आहे. तसेच त्यांचे निवासस्थान हे कोरोना वॉर  रूम बनली आहे.


कोरोना रुग्ण वाढ थांबवण्यासाठी लसीकरण अत्यंत गरजेचे असून काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या सुचने नुसार महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी सर्वप्रथम राज्यात १८ ते ४५ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात यावे अशी मागणीही सरकारकडे केली होती. यावर महाविकास आघाडी सरकारने राज्यात मोफत लसीकरणाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून यामुळे आर्थिक संकटाचा मोठा ताण राज्यावर पडणार आहे.

यात कृतिशीलतेतून पुढे येत महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी स्वतः एक वर्षाचे मानधन कोरोना लसीकरणाकरीता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या सर्व आमदारांचे एक महिन्याचे वेतन सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिले जाणार आहे. तसेच महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या वतीने पाच लाख रुपयांचा निधीही दिला आहे.

याच बरोबर संगमनेर मधील नागरिकांच्या सुख दुःखात व आपत्तीच्या वेळी सातत्याने पाठीशी उभा राहणारा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील अमृत उद्योग समूह या कोरोना संकटातही जनतेच्या मदती करता पुढे आला आहे. थोरात कारखान्याने नुकतेच ५०० बेडचे कोवीड केअर सेंटर सुरू केले असून एसएमबीटी या संस्थेच्या वतीने तालुक्यातील विविध रुग्णालयात व केअर सेंटरमध्ये वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत.

नव्याने होणाऱ्या लसीकरणात अमृत उद्योग समूहातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था, श्याम्प्रो, राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनी, सह्याद्री बहुजन शिक्षण संस्था, एस.एम.बी.टी सेवाभावी संस्था, हरिश्चंद्र पाणीपुरवठा फेडरेशन, गरुड कुकुटपालन ,शेतकी संघ, अमृतवाहिनी बँक यांसह सर्व सहकारी संस्थांमधील सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा निधी हा सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला जाणार आहे.

सातत्याने जन माणसांच्या विकासाकरता काम करणारे नामदार बाळासाहेब थोरात यांनी कृतिशील तेथून कायम जनतेला मदत केली आहे. कोरोना संकटात उपचार पुरवणे याचबरोबर बेड मिळवून देण्यासाठी यशोधन कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन असून ऑक्सिजनसाठीही ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत. अशा संकटाच्या वेळी जनतेसाठी लढणारे नामदार बाळासाहेब थोरात यांनी आपले एक वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधी देऊन सर्वांपुढे आदर्श निर्माण केला आहे. नामदार थोरात यांच्या या आदर्श उपक्रमाचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker