कोपरगाव महाराष्ट्र

मेडीकव्हर तांबे हॉस्पिटलमध्ये 89 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

मेडीकव्हर तांबे हॉस्पिटलमध्ये 89 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

संगमनेर ( कोपरगाव परिसर)- सध्याच्या कठीण काळात जिथे आपण सगळीकडे नकारात्मक परिस्थितीचा अनुभव घेत आहोत त्याच परिस्थितीत संगमनेर मध्ये नुकत्याच चालू झालेल्या बहुराष्ट्रीय साखळी असलेल्या मेडीकव्हर ( तांबे ) येथे, ८९ वर्ष वयाच्या आजोबांना मिळाले नवीन आयुष्य.

घसरत जाणारा ऑक्सिजन आणि त्याच बरोबर पूर्वी पासून असलेला मेंदुरोग या परिस्थतीमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलला पूर्ण सहकार्याची ग्वाही दि. आणि मग डॉ. सुशांत गिते यांच्या देखरेखी खाली, उपचार सुरू झाले.औषधे, ऑक्सिजनचा तुडवडा सहन करत सर्व कर्मचाऱ्यांनी जागतिक दर्जाच्या निकषांनुसार उपचार सुरू केले आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या अथक मेहणतीला आजोबांच्या शरीराने देखील प्रतिसाद दिला.आणि १२ दिवसांच्या ट्रीटमेंट नंतर आजोबांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला.

सकारात्मक विचार करण्याची पद्धत नातेवाईकांचे पाठबळ आणि खंबीर मनोवृत्ती यामुळे प्रत्येक माणूस कोरोनावर यशस्वीपणे मात करू शकतो असेही यावेळी आजोबा म्हणाले. मेडीकव्हर हॉस्पिटल येथील डॉ सुशांत गिते, डॉ कैलास मांडे, सिस्टर अनिता काटे, सिस्टर खैरे ब्रदर सर्जित, ऑपरेशन मॅनेजर सचिन इंगळे, दिपक जाधव, सुमित अहिरराव यांच्या बरोबर सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न घेतले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker