कोपरगाव महाराष्ट्र

कै. जगन्नाथ औताडे, एक व्रतस्थ व्यक्तिमत्व हरपले   -सतिश गंगाधर चव्हाणके

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

कै. जगन्नाथ औताडे, एक व्रतस्थ व्यक्तिमत्व हरपले
  -सतिश गंगाधर चव्हाणके

कोपरगांव परिसर – मुळचे पोहेगांव व सध्या कोपरगांव येथे वास्तव्यास असणारे, जुन्या पिढीतील जेष्ठ विधिज्ञ, कायदे पंडीत जगन्नाथ पांडुरंग औताडे यांचे चैत्रमास गुरूवार दि. २२/०४/२०२१ रोजी वृध्दापकाळाने नाशिक  येथे त्यांचे चिरंजीव आर्थोपेडीक सर्जन डाॅ. गिरीश  औताडे यांचे घरी निधन झाले. ते ९१ वर्षांचे  होते. त्यांच्या पश्चात  पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परीवार आहे. त्यांच्या जाण्याने एक व्रतस्थ व्यक्तिमत्व हरपले आहे, अशी  माहिती कै. औताडे यांचे भाचे निवृत्त अभियंता, पाटबंधारे विभाग सतिष गंगाधर चव्हाणके यांनी पसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात चव्हाणके यांनी पुढे म्हटले आहे की कै. औताडे यांचे चिरंजीव डाॅ. गिरीश  व  स्नुषा सौ. दक्षा यांनी मामा-मामींनी नाशिकला  रहावे यासाठी खुप प्रयत्न केले. परंतु आम्हाला कोपरगांवलाच करमते, येथिल जुन्या मित्र मंडळीत मन रमते असे मामा सांगायचे. फक्त सणांच्या काळात ते नाशिकला १०-१२  दिवस जात असत. आपले गणगोत एकत्र आले की मामांना अतिशय आनंद होत असे, याची जाणिव डाॅ. गिरीश  व सौ. दक्षा यांना होती. म्हणुन अनेकदा सौ. दक्षा यांनी नातेवाईकांना बोलवुन निवासस्थानी गप्पा गोष्टी , गीत गायन आणि स्नेह भोजनाचे कार्यक्रम घेतले. १८ जानेवारी २०२१ च्या मेळाव्यात मोठी मुलगी सौ. जयश्री अजितसिंह पाटील (माजी मंत्री श्री पद्मसिंह पाटील यांची भावजय) यांनी मामींनी लिहिलेली कविता वाचुन दाखविली, त्यावेळी मामांना खुप आनंद झाला होता. मामांना ४-५ महिन्यांपासुन विस्मरण होत होते.त्यामुळे ते कमी बोलत. १५ दिवसांपासुन त्यांचे जेवण कमी झाले होते. डाॅ. गिरीश  यांनी आपल्या दवाखान्यात सर्व तपासण्या करून घेतल्या, कोणताही आजार निघाला नाही, मात्र उतार वयामुळे हृदय कमकुवत  झाले, असे सर्व डाॅक्टरांनी सांगीतले. असे अजातशत्रु कै. औताडे अखेर वयाच्या ९१ व्या वर्षी  अनंतात विलीन झाले.  

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker